शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ...

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात मजुरांच्या मजुरीच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने उत्पादन हाेत नसून शासनाकडून हमीभावही मिळत नाही. शेती लागवडीचा खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडत आहेत.

बी-बियाणे, कीटकनाशके आदींच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुरुष मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये १३० रुपये तर महिला मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्या मानाने शासनाकडून धानाच्या भावात वाढ केली जात नाही. घरची शेती असणारे अनेक युवक पानठेला, कुक्कुटपालन व इतर छाेटे-माेठे व्यवसाय आणि खासगी नाेकरी करून जीवन जगत आहेत.

बाॅक्स...

शेती व्यवसाय झाला जाेखीम व दगदगीचा

- १० ते १५ वर्षांपूर्वी शेती व्यवसायात मजूर माेठ्या संख्येने मिळत हाेते. पूर्वी आवडीने शेती व्यवसाय केला जात हाेता. मात्र, आता शेती व्यवसाय जाेखीम व दगदगीचा झाला आहे. शेतीकामासाठी सहजासहजी मजूर मिळत नसल्याचे घारगाव येथील शेतकरी याेगेश आभारे यांनी सांगितले आहे.

- गडचिराेली तालुक्यासह जिल्ह्यात सिंचन सुविधा पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाल्या नाही. परिणामी कधी ओला तर कधी काेरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीमुळे आजची पिढी फारसा शेती व्यवसाय करण्यास तयार हाेत नाही, असे नगरी येथील शेतकरी महेश वाघरे यांनी सांगितले.

- शेती व्यवसायाला बकरी पालन, कुक्कुटपालन व इतर जाेडधंद्यांची साथ दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती हाेऊ शकते. केवळ धानपिकाच्या शेतीवर काेणताही शेतकरी प्रगती साधू शकत नाही. आधीच गडचिराेली जिल्ह्यातील शेती व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शासनाने शेतकऱ्यांना विशेष सूट देऊन राेहयाेअंतर्गत शेतीची कामे करावी, अशी मागणी माेहझरी येथील शेतकरी श्रावण महामंडरे यांनी केली.

बाॅक्स...

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

कृषी क्षेत्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून यंत्राचा वापर प्रचंड वाढला आहे. शासन व प्रशासकीय स्तरावरून जनजागृती झाल्याने तसेच मजुरांची वानवा असल्याने बहुतांश कामे यंत्राद्वारे शेतकरी करत आहे. धान व इतर पिकांतील तण/कचरा काढणे, खत टाकणे, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे, निंदण करणे आदी कामे मजुरांमार्फतच केली जात आहेत. मात्र, नांगरणी, चिखलणीपासून मळणीपर्यंतची कामे यंत्राद्वारे हाेत आहे.

बाॅक्स..

यंत्राने होणारी कामे

यंत्राद्वारे शेतातील नांगरणी, चिखलणी, पेरणी, कापणी, मळणी आदी कामे गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहेत.