ना. वडेट्टीवार यांनी केले डॉ. मडावी यांच्या कुटुंबाचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST2021-05-31T04:26:53+5:302021-05-31T04:26:53+5:30

माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांची पत्नी सुप्रिया यांचे कोरोनाच्या आजाराने ३० एप्रिल राेजी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन ...

No. Dr. Vadettiwar did. Consolation to Madavi's family | ना. वडेट्टीवार यांनी केले डॉ. मडावी यांच्या कुटुंबाचे सांत्वन

ना. वडेट्टीवार यांनी केले डॉ. मडावी यांच्या कुटुंबाचे सांत्वन

माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांची पत्नी सुप्रिया यांचे कोरोनाच्या आजाराने ३० एप्रिल राेजी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यामुळे ना. विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आरमोरी येथे भेट देऊन मडावी परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराज गेडाम, जि.प. सदस्य राम मेश्राम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, राजू अंबानी, तेजस मडावी, विश्वास भोवते, डॉ. महेश कोपुलवार, परसराम टिकले, चिनी मोटवानी, अशोक वाकडे, अमीन लालानी, संदीप ठाकूर, बाळा बोरकर, बुधा किरमे, हेमलता वाघाडे, कल्पना तिजारे, मेघा मने, रोशनी बैस, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, सुदाम मोटवानी विजय सुपारे, विलास दाणे, नामदेव सोरते, महेंद्र शेंडे, विनोद बेहरे, गणेश तिजारे, नंदू खान्देशकर, आकाश मडावी व कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

290521\5751img_20210529_165601.jpg

===Caption===

माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी यांच्या पत्नी सुप्रिया मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून श्रद्धांजली वाहताना ना विजय वडेट्टीवार

Web Title: No. Dr. Vadettiwar did. Consolation to Madavi's family