शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या सर्व जातींनी एकसंघ लढा देण्याची गरज

By admin | Updated: January 17, 2016 01:21 IST

महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ पोटजाती आहेत. यापैकी अनेक पोटजाती वेगवेगळ्या दिशेने आपल्या अधिकार ...

नीलकांत कुलसंगे यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत राज्यस्तरीय चर्चासत्रगडचिरोली : महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ पोटजाती आहेत. यापैकी अनेक पोटजाती वेगवेगळ्या दिशेने आपल्या अधिकार व हक्कासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येते. प्रसंगी एकमेकांच्याच विरोधातही भूमिका बजावीत असल्याचे विदारक चित्र आहे. आदिवासींमध्ये आपापसात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आदिवासींना सर्व घटनादत अधिकार मिळून त्यांचा विकास होण्यासाठी सर्व पोटजातींनी एकसंघ लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूरचे नाट्य दिग्दर्शक डॉ. नीलकांत कुलसंगे यांनी केले.आदिवासी सोशल फोरम महाराष्ट्र, बहुजन संघर्ष व अखिल भारतीय आदिवासी महासभा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्व. नेताजी राजगडकर यांच्या ६६ व्या जयंतीनिमित्त ‘आदिवासींची स्थिती व आव्हाने’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी येथील गोंडवाना कला दालनात झाले, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हिरामण वरखडे तर प्रमुख अतिथी म्हणून अंजली राजगडकर उपस्थित होत्या. यावेळी डॉ. कुलसंगे म्हणाले, पूर्वी एकसंघ आदिवासींचा विचार व उल्लेख केला जात होता. मात्र आता प्रत्येक राजकीय पक्षात आदिवासींचे पदाधिकारी असल्याने पोटजातीचा उल्लेख होताना दिसून येत आहे. आदिवासी समाजातील विविध पोटजातीत अनेक राजकीय पुढारी आहेत. काही सत्तापक्षात तर काही विरोधी पक्षात आहेत. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश आदिवासी पुढारी तसेच लोकप्रतिनिधी समाजनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेलाच अधिक महत्त्व देत असल्याची खंत डॉ. कुलसंगे यांनी व्यक्त केली. एकसंघ राहून सर्व आदिवासींनी संघर्ष केल्यास शासन व प्रशासनही त्यांच्यापुढे झुकेल, यातून आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार व हक्क मिळून विकास होण्यास मदत होईल. आदिवासींच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात विशेषकरून आश्रमशाळा व आदिवासींच्या सर्व योजनांबाबत सखोल विचार करण्याची गरज आहे. असेही कुलसंगे म्हणाले. यावेळी माजी आ. हिरामण वरखडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभू राजगडकर यांनी केले तर संचालन व आभार राजेंद्र मरसकोल्हे यांनी केले.