राष्ट्रवादीच्या परिवार संवादाचा आज अहेरीतून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:31+5:302021-02-05T08:48:31+5:30

परिसंवाद कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ...

NCP's family dialogue starts from Aheri today | राष्ट्रवादीच्या परिवार संवादाचा आज अहेरीतून शुभारंभ

राष्ट्रवादीच्या परिवार संवादाचा आज अहेरीतून शुभारंभ

परिसंवाद कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र सामला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्रिमहाेदय घेणार आहेत. त्यानंतर लगेच स्थानिक इंडियन पॅलेस फंक्शन हॉल येथे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील पदाधिकारी, पक्षाचे फ्रंटल व वेगवेगळ्या सेलचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

Web Title: NCP's family dialogue starts from Aheri today