शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

'बनावट कट रचून माझ्या पतीची केली हत्या' शरण आलेल्या माओवादी नेत्यांवर गंभीर आरोप

By संजय तिपाले | Updated: October 31, 2025 16:10 IST

Gadchiroli : छत्तीसगडच्या जगदलपूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शांतीप्रियाने माध्यमांशी संवाद साधताना थरकाप उडवणारे आरोप केले.

गडचिरोली : छत्तीसगडमधील सप्टेंबर महिन्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जहाल नक्षल नेता आणि सेंट्रल कमिटी सदस्य कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू दादा याच्या मृत्यूने नक्षली चळवळीत जबरदस्त धक्के दिले आहेत. या घटनेनंतर आता राजू दादाची पत्नी शांतीप्रिया हिने केलेल्या सनसनाटी खुलाशाने संपूर्ण माओवादी संघटना हादरली आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या काही वरिष्ठ नेत्यांनीच माझ्या पतीची हत्या केली, असा गंभीर आरोप तिने केला आहे. छत्तीसगडच्या जगदलपूर येथे  ३१ ऑक्टोबर  रोजी आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शांतीप्रियाने माध्यमांशी संवाद साधताना थरकाप उडवणारे आरोप केले. ती म्हणाली,  माझ्या पतीला आणि कोसा दादाला २२ सप्टेंबर रोजी जिवंत पकडण्यात आले होते. त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि नंतर बनावट चकमकीत हत्या केली. हा सगळा कट संघटनेतील फितुरांनी रचला, असा दावा तिने केला.

गद्दारांना सरकार ब्रँड अँबेसेडर बनवतंय !

आत्मसमर्पित माओवादी नेत्यांवर निशाणा साधत शांतीप्रिया पुढे म्हणाली, हेच गद्दार आज शरणागती पत्करून सरकारकडून सन्मान मिळवत आहेत. सरकार त्यांना ‘ब्रँड अँबेसेडर’ बनवतंय, आणि आम्हाला मात्र न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच ढळला आहे.  काही नेत्यांना शरण जाऊन ऐशोआरामात जीवन जगायचे होते, म्हणूनच त्यांनी माझ्या पतीचा बळी दिला, असा दावा तिने केला. 

भूपती, रुपेश उत्तर देणार का?

राजू दादाच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच या चकमकीला ‘बनावट’ ठरवत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. या आरोपांनंतर नक्षली चळवळीतील अंतर्गत गटबाजी, संशय आणि अविश्वास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शांतीप्रियाच्या या थेट आरोपांमुळे शरणागती पत्करलेल्या या नेत्यांवर संशयाचे सावट गडद झाले  आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेला पॉलिट ब्युरो सदस्य भूपती उर्फ सोनू दादा आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा कमांडर रूपेश उर्फ सतीश हे आता या आरोपांना काय उत्तर देतात  याकडे संपूर्ण  सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist leader's wife alleges conspiracy in husband's killing after surrender.

Web Summary : Shantipriya, wife of slain Maoist leader Raju Dada, accuses surrendered leaders of plotting his murder in a fake encounter. She claims these leaders are now rewarded by the government, while her family seeks justice through the courts.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार