राममंदिरासाठी मुस्लिम समाजाने दिला ११ हजारांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:12+5:302021-02-05T08:48:12+5:30

कुरखेडा : येथील मुस्लिम समाज मंडळाचे माजी अध्यक्ष हाजी मकसूद शेख यांनी राममंदिर निर्माण कार्याकरिता सुमारे ११ हजार रुपयांचा ...

The Muslim community donated Rs 11,000 for the Ram temple | राममंदिरासाठी मुस्लिम समाजाने दिला ११ हजारांचा निधी

राममंदिरासाठी मुस्लिम समाजाने दिला ११ हजारांचा निधी

कुरखेडा : येथील मुस्लिम समाज मंडळाचे माजी अध्यक्ष हाजी मकसूद शेख यांनी राममंदिर निर्माण कार्याकरिता सुमारे ११ हजार रुपयांचा धनादेश निधी संकलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

कुरखेडा शहर व तालुक्यात मुस्लिम समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. हिंदू व मुस्लिम या दाेन समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांचे सण, उत्सव माेठ्या आनंदात दाेन्ही समाजाचे नागरिक साजरे करतात. तसेच दु:खाच्या वेळी एकमेकांना मदत करतात. हाजी मकसूद शेख यांनी राममंदिराला दिलेल्या मदतीमुळे दाेन्ही समाजात असलेल्या या सद्भावनेला आणखी बळ मिळाले आहे. राममंदिरासाठी निधी सुपूर्द करतेवेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मसूदभाई शेख, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, माजी नगराध्याक्ष रवींद्र गोटेफोडे, नानाजी खुणे, पवन डहारे उपस्थित हाेते.

Web Title: The Muslim community donated Rs 11,000 for the Ram temple