शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याने ग्राहकांना रोकडसाठी धावपळ करावी लागली.

ठळक मुद्देपुरेशी रोकड ठेवण्याची मागणी : रोकडसाठी नागरिकांची दोन दिवस धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बँकेतील गर्दी कमी व्हावी, लोकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी बँक प्रशासनाच्या वतीने जिल्हा व तालुका मुख्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये एटीएमची सुविधा करण्यात आली. मात्र शनिवार व रविवारी दोन दिवस गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याने ग्राहकांना रोकडसाठी धावपळ करावी लागली.गडचिरोली शहरात चंद्रपूर, धानोरा, चामोर्शी या तीन मार्गावर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती व इतर बँकांचे एटीएम आहेत. याशिवाय कॉम्प्लेक्स परिसरात नवेगावपर्यंत एटीएम आहेत. गुरूवारी व शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात संपाची हाक दिली होती. मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर दोन्ही दिवशी राष्ट्रीययकृत बँका सुरू होत्या. चौथा शनिवार व रविवारला बँकांना सुट्टी होती. शनिवारी दुपारी २ वाजतानंतर शहरातील बºयाच एटीएममधील रोकड संपली. त्यामुळे ग्राहक दुसºया ठिकाणच्या एटीएमकडे धाव घेऊ लागले. परिणामी बºयाच लोकांना ऑनलाईन व्यवहार करावा लागला.शनिवारी व रविवारी दोन दिवस ग्राहकांना एटीएममधून रोकड उपलब्ध करण्यास अडचणी आल्या. सोमवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत चामोर्शी तसेच चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीययकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड नव्हती. परिणामी अनेक ग्राहक परत जाताना दिसून आले. कॉम्प्लेक्स परिसरातही एटीएमबाबत अशीच परिस्थिती होती.आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज या तालुक्यातही शनिवार व रविवारी बºयाच एटीएममध्ये रोकड नसल्याने ग्राहक त्रस्त झाले होते.

जिल्हा सहकारी बँकेच्या एटीएमचा आधारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या शहरात पाच शाखा आहेत. धानोरा मार्गावर मुख्य शाखा, त्रिमूर्ती चौक, आरमोरी मार्ग व कॉम्प्लेक्स परिसरात दोन शाखा आहेत. या सर्व शाखांच्या माध्यमातून एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सदर बँकेच्या एटीएममध्ये रोकड उपलब्ध होती. ग्राहकांनी एटीएममध्ये येऊन या सेवेचा लाभ घेतला. त्रिमूर्ती चौकातील एटीएमकडे बरेच ग्राहक धाव घेत असल्याचे दिसून आले. राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम कॅशलेस झाल्याने ग्राहकांची धावपळ सुरू झाली. दरम्यान जिल्हा बँकेच्या एटीएममध्ये रोकड असल्याचे कळताच ग्राहकांचा लोंढा या एटीएमकडे वळला.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र