शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजमधील दुधाचा महापूर ओसरला

By admin | Updated: January 10, 2015 22:53 IST

दुधाळ गायी आणि विदेशातून आणलेल्या जर्सी गायींच्या वळूंची पैदास करून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी देसाईगंज येथे उभारण्यात आलेल्या पशुधन पैदास प्रक्षेत्राची दूरवस्था झाली आहे.

महेंद्र चचाणे - देसाईगंजदुधाळ गायी आणि विदेशातून आणलेल्या जर्सी गायींच्या वळूंची पैदास करून दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी देसाईगंज येथे उभारण्यात आलेल्या पशुधन पैदास प्रक्षेत्राची दूरवस्था झाली आहे. या केंद्रातून शासनाला शून्य उत्पन्न मिळत असताना मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला १५ लाखाचा खर्च केला जात आहे. देसाईगंज येथे १९७८ मध्ये पशुधन पैदास प्रक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. मात्र शासकीय स्तरावरची उदासिनता व येथे कार्यरत तत्कालीन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या दोन गोष्टींमुळे पशुपैदास प्रक्षेत्र पूर्णपणे मोडीत निघाले आहे.१४०० हेक्टर जागेवर पसरलेल्या प्रक्षेत्राला आता जंगलाचे स्वरूप आले आहे. प्रारंभी या कार्यालयात बदली झाली म्हणून नोकरी करण्याच्या मानसिकतेतून आलेल्या अधिकाऱ्यांनी या पशुपैदास क्षेत्राचे बारा वाजविले. या केंद्राची देखभाल व प्रशासकीय व्यवस्थापन हे पशुसंवर्धन विभागाकडे सोपविण्यात आले. त्यांच्याकडून मागणी करूनही साहित्याचा पुरवठा होत नव्हता. त्यानंतर दादासाहेब देवतळे मंत्री झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडून प्रक्षेत्रासाठी १५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून देसाईगंजपासून ३ किमी अंतरावर वळूमाता प्रक्षेत्र व दुग्ध उत्पादन केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्याकरिता पशुसंर्धन विभागाला सभोवतालच्या जंगलाची १४०० हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली. सन १९७८ मध्ये या केंद्राला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात १९८२ पासून विसोरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वळूमाता संगोपण व पैदास प्रक्षेत्र सुरू झाले. यावेळी तेथे ९८ आॅस्ट्रेलियन गायी व दोन सांड येथे आणण्यात आले. तेव्हा एका दिवसाला ५०० ते दीड हजार लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन घेतले जात होते. दुग्ध व्यवसायात वडसा हे गाव विदर्भात गणल्या जात होते. मात्र या प्रक्षेत्रात पूर्वी ज्या वसाहतीत कर्मचारी राहत होते, त्या वसाहतीला आता जंगलाचे रूप आले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व लिपिक येथे राहतात. अधिकारी मात्र देसाईगंज शहरातून येथे ये-जा करतात.