शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:19 IST

NCP : खासदार शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला.

NCP ( Marathi News ) :  खासदार शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. मंत्री बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मंत्री बाबा आत्राम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, याआधी राजकीय पक्षांनी तयारी केली. आज गडचिरोली येथे जाहीर पक्षप्रवेश झाला. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की, "आठ दिवसापूर्वी इथे एक यात्रा झाली, ती यात्रा म्हणजे जनअपमान यात्रा. त्या यात्रेचे नाव जनसन्मान यात्रा असायलाच नाही पाहिजे, कारण जनतेसोबत गद्दारी करुन जी यात्रा निघते ती यात्रा जनअपमान यात्रा असते, असा टोलाही मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेला लगावला. 

"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?

'त्या यात्रेत बाबा आत्राम यांनी आपल्या मुलीबाबत विधान केले. त्यांना मुलगी सोडून जाते याचा राग अनावर झाला. 'आत्राम म्हणाले की, त्यांना नदीमध्ये फेकले पाहिजे',आत्राम साहेब तुमची मुलगी आहे, राग येणा साहजीक आहे. पण तुम्ही भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता ताईला भाग्यश्री ताईला नदीत फेकावे वाटले, एवढा राग आला. पण, बाबा तुमच्या स्टेजवर जे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते. त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांना तीनवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केले, त्यांना विरोधीपक्षनेता केले, त्यांना आमदार केले, राज्यमंत्री केले १८ वर्षे सोन्याचा चमचा तोंडात दिला. त्या अजितदादांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत सूरा खूपसला त्यांना कुठे फेकायचे हे पण सांगून टाका',अशी टीकाही मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. 

"अजितदादा तुम्ही त्या कार्यक्रमात सांगता भाग्यश्रीताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ती बापाची झाली नाही ती जनतेची काय होणार. मग दादा तुम्ही देखील काकांचे झाले नाहीत, मग लोकांचे काय होणार, असंही शेख म्हणाले.  भाग्यश्री ताई तुमच्या प्रवेशाने अजितदादा म्हणाले वस्ताद एक डाव शिल्लक ठेवत असतो. तसे तुम्हाला अजून काकांचा एक डाव शिल्लक आहे, असा निशाणाही अजित पवार यांच्यावर साधला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील