शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

मेडिगड्डा बॅरेज ठरतेय कोरोनाचे प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस चौक्या लावण्यात आल्या असल्या तरी नागरिक विविध कारणे सांगून पोलिसांना विनंती करून तेलंगणा राज्यात ये-जा करतात. तेलंगणातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात येऊन परत जातात.

ठळक मुद्देविनापरवानगीने ये-जा सुरू : नाक्यावरील नियम कडक करण्याची मागणी; कोरोनाच्या संसर्गाचा धोका

महेश आगुला ।लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडिगड्डा बॅरेजच्या पुलावरून सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विनापरवानगीने तेलंगणात जाऊन परत येतात. तर तेलंगणातीलही नागरिक खुलेआम सिरोंचा तालुक्यात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागाने गुरूवारी अंकिसा येथील नागरिकांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केली असता, पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.प्राणहिता व गोदावरी या दोन नद्या महाराष्टÑ व तेलंगणा राज्याच्या दुभाजक आहेत. सिरोंचा तालुका व तेलंगणा राज्यातील नागरिकांची संस्कृती सारखी आहे. तसेच या दोन भागांमध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. त्यामुळे वर्षभर ये-जा सुरू राहते. पाच वर्षांपूर्वी प्राणहिता व गोदावरी नदीवर एकही पूल नसल्याने पावसाळ्यात ये-जा मर्यादित राहत होती. मात्र सिरोंचा तालुक्यात धर्मपुरी व कालेश्वरमरजवळ पूल झाला आहे. तसेच अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस चौक्या लावण्यात आल्या असल्या तरी नागरिक विविध कारणे सांगून पोलिसांना विनंती करून तेलंगणा राज्यात ये-जा करतात. तेलंगणातीलही नागरिक सिरोंचा तालुक्यात येऊन परत जातात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, विनापरवानगीने ये-जा करीत असल्याने आरोग्य विभागाच्याही सदर नागरिक लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ई-पास काढून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाणे शासनाने सक्तीचे केले असले तरी हे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य व पोलीस विभागाने दक्षता घेण्याची गरज आहे.अंकिसात आढळले पाच कोरोनाबाधित?अंकिसा येथे गुरूवारी कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. यादरम्यान घेतलेल्या रॅपिड एन्टीजन टेस्टमध्ये सिरोंचातील चार व रंगधामपेठा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बाधितांमधील एक व्यक्ती ग्रा.पं.चा लिपीक आहे. हा मेडिगड्डा मार्गे तेलंगणात गेला होता. त्यांच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्ती व रंगधामपेठा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. बाधितांची संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरू आहे, अशी माहिती सिरोंचाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोहर कन्नाके यांनी दिली आहे.२ कोरोनामुक्त, ४ बाधितगडचिरोली व देसाईगंज येथील प्रत्येकी एक रूग्ण कोरोनामुक्त झाला. तर चार रूग्ण बाधित आढळून आले आहेत. बाधितांमध्ये गडचिरोली पोलीस कॉलनीतील एक पोलीस, मुलचेरातील आरोग्य सेविका, धानोरा पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी व याच तालुक्यात नागपूरवरून आलेला एकाचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या