शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांच्या नाकावरून हटला मास्क, डेल्टा प्लसला रोखणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST

गडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण जसजसे कमी होत आहेत तसतसे लोक बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. ४० टक्के लोक ...

गडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण जसजसे कमी होत आहेत तसतसे लोक बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. ४० टक्के लोक सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करीत असले तरी नियम न पाळणाऱ्यांची संख्या ६० टक्के आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रियेतील पुढचा टप्पा गाठण्याचा विचार सरकार करत असताना बिनधास्तपणे वागणाऱ्या लोकांमुळे ‘डेल्टा प्लस’ या नवीन व्हेरिएंटला आमंत्रण मिळून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग कोरोनाची तिसरी लाट येणार हे गृहित धरून तयारीला लागला आहे. डेल्टा प्लस हा कोरोनाचा व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त घातक आहे. त्यामुळे उपचारापेक्षा रोगापासून दूर राहण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

(बॉक्स)

मास्क नसणाऱ्यांवरील कारवाई थंडावली

- गडचिरोली शहरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी नगर परिषदेकडे दिली आहे.

- दोन महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेच्या पथकाने बऱ्याच प्रमाणात कारवाया करून दंडही वसूल केला आहे.

- कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर नगर परिषदेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाया बंद केल्या.

(बॉक्स)

वाहतूक शिपायासोबत नगर परिषदेचा माणूस द्या

शहरातील वाहतूक नियंत्रण पोलिसांना कोरोनाच्या नियमांसाठी कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे चौकात ड्युटी करणाऱ्या वाहतूक नियंत्रक शिपायासोबत नगर परिषदेने आपल्या माणसाची ड्युटी लावून दिल्यास वाहतुकीसोबत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई करणे सोपे होऊ शकते. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

(कोट)

- तर कारवाई करणार

कोरोनाची लाट कमी झाली असली तरी नागरिकांनी अजूनही नियमांचे पालन करायचे आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी मास्क लावूनच जातात. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. म्हणजे नागरिक मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही. तरीही लोक नियम पाळत नसतील तर पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल.

- रवींद्र भंडारवार

उपमुख्याधिकारी, न. प. गडचिरोली