आलापल्लीत हाेणार माळी समाजभवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:02+5:302021-02-09T04:39:02+5:30

आलापल्ली : आलापल्ली येथे माळी समाज भवनाचा प्रारंभ जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला. सांस्कृतिक ...

Mali Samaj Bhavan will be held in Alapally | आलापल्लीत हाेणार माळी समाजभवन

आलापल्लीत हाेणार माळी समाजभवन

आलापल्ली : आलापल्ली येथे माळी समाज भवनाचा प्रारंभ जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.

सांस्कृतिक तथा अन्य कार्यक्रम घेण्यासाठी तसेच रूढी-परंपरा, चालीरीतींची जोपासना करण्यासाठी समाजभवन नसल्याने माळी समाज बांधवांना अनेक अडचणी येत हाेत्या. त्यामुळे माळी समाजबांधवांनी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देऊन समाज भवन मंजूर करण्याची मागणी केली हाेती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध झाला. काही महिन्यांत समाज भवनाचे बांधकाम पूर्ण हाेणार आहे.

समाजभवनाच्या बांधकामाचा प्रारंभ जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पुरुषोत्तम सोनुले, गजानन ठाकरे, बापू गुरनुले, राजू ठाकरे, लक्ष्मण ठाकरे, अविनाश ठाकरे, दिलीप गंजीवार, संतोष तोडसाम, चंदू बेज्जलवार, जुलेख शेख, ग्रामसेविका गेडाम, कनिष्ठ अभियंता रामटेके, सचिन वर्मा, जुनेद शेख उपस्थित होते.

Web Title: Mali Samaj Bhavan will be held in Alapally