शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; गडचिरोली विधानसभेत राहणार दोन बॅलेट युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण जाणार नाही. उमेदवारांचे नाव, चिन्ह यासाठी गुलाबी रंगाचा कागद वापरला जाणार आहे.

ठळक मुद्देउमेदवार जास्त असल्याने अडचण : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उभ्या असलेल्या १६ उमेदवारांच्या नावांसह नोटाच्या पर्यायासाठी एका बॅलेट युनिटवर जागाच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या मतदार संघातील प्रत्येक बुथवर दोन बॅलेट युनिट राहतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.मतदान यंत्रावर (बॅलेट युनिट) केवळ १६ बटन असतात. गडचिरोलीत उमेदवार १६ आहेत. पण नोटाच्या पर्याय बॅलेट युनिटवर आवश्यक असल्यामुळे त्याच्यासाठी पहिल्या बॅलेट युनिटवर जागाच नाही. एक बटन कमी पडत असल्याने दोन मतदान यंत्रांचा प्रत्येक बुथावर वापर केला जाणार असून ‘नोटा’चा पर्याय दुसऱ्या बॅलेट युनिटवर राहील, अशी माहिती डॉ.जाखड यांनी दिली.डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण जाणार नाही. उमेदवारांचे नाव, चिन्ह यासाठी गुलाबी रंगाचा कागद वापरला जाणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक विभागाकडे ४६४ कंट्रोल युनिट, ८९९ बॅलट युनिट, ४८८ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत. वेळेवर मतदान केंद्र बंद पडल्यास धांदला होऊ नये यासाठी अधिकच्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. वेळेवर मशीन उपलब्ध व्हावी यासाठी या मशीन क्षेत्रीय अधिकारी, तहसील व उपविभागीय कार्यालयात ठेवल्या जातील. मागणी होताच मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती जाखड यांनी दिली. यावेळी तहसीलदार महेंद्र गणवीर हजर होते.दीड तासापूर्वीच मॉकपोलसकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदानाच्या दीड तासापूर्वी मॉकपोल घ्यावा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे मॉक पोलला सकाळी ५.३० वाजता सुरूवात केली जाणार आहे. मतदान यंत्राची पारदर्शकता तपासण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र उमेदवारांचे प्रतिनिधी वेळेवर उपस्थित न झाल्यास मतदान केंद्राध्यक्ष मॉक पोलला सुरूवात करतील. मॉकपोलमध्ये किमान ५० मते वेगवेगळ्या उमेदवारांना टाकली जातील. मशीनमध्ये दाखवित असलेली मते व व्हीव्हीपॅटमधील चिट्या मोजल्या जातात. यावरून मशीनची पारदर्शकता दिसून येते.‘नोटा’ऐवजी आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’विधानसभा क्षेत्रात उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला मत द्यायचे नाही. मात्र मतदान करायचे असेल तर संबंधित मतदाराला नोटावर (नन ऑफ द अबो) मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यापूर्वी इंग्रजीमध्ये ठडळअ असे लिहिले राहत होते. उमेदवारांची नावे मराठीत, मात्र ही एकच बटन इंग्रजीमध्ये राहत होती. काही जणांना नोटाचा अर्थही कळत नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक भाषेचा वापर करून तसा अर्थबोध होईल, असा शब्द लिहावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘नोटा’ ऐवजी ‘वरील पैकी कुणीही नाही’, असे लिहिले राहणार आहे. मराठीत असल्याने मतदारांना समजण्यास सोपे जाणार आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली