शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; पहिले मत दारूमुक्त गडचिरोलीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

युवा हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. बळकट लोकशाहीसाठी हा आधारस्तंभ व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्यासाठी शासकीय-निमशासकीय संस्था जनजागृती करीत आहे.

ठळक मुद्देदोन हजार युवांचा एकमताने निर्णय : दारूमुक्त निवडणुकीसाठी जिल्हाभर व्यापक जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील युवक युवतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील दारूबंदी टिकविण्यासाठी नेतृत्वही दारूमुक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे आमचे पहिले मत दारूबंदीचे समर्थन करणाऱ्या उमेदवारालाच देण्याचा निर्धार जिल्ह्यातील १६ महाविद्यालयातील तब्बल २ हजार युवक युवतींनी व्यक्त केला आहे.युवा हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. बळकट लोकशाहीसाठी हा आधारस्तंभ व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्यासाठी शासकीय-निमशासकीय संस्था जनजागृती करीत आहे. पण याहीपुढे जाऊन सशक्त लोकशाहीसाठी ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च संस्थेच्या जीवन शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.महाविद्यालयीन बहुतेक युवक युवतींचे हे पहिलेच मतदान असणार आहे. त्यामुळे त्यांनी मतदानाचा पहिलाच अधिकार विचारपूर्वक बजावण्यासाठी सर्च संस्थेच्या चमूद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण चोरून लपून दारूची विक्री होत आहे. याचा त्रास जिल्ह्यातील जनतेला भोगावा लागतो. निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याबाबत सर्च संस्थेची चमू महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन करीत आहे. आतापर्यंत गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, धानोरा येथील तब्बल १६ महाविद्यालयातील दोन हजार युवक युवतींनी या अभियानात सहभागी होत दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. दारूमुक्त गडचिरोलीसाठी पहिले मत दारूमुक्त उमेदवारालाच देण्याचा निर्धार युवांनी केला आहे. गावागावात युवकांकडून दारुमुक्त निवडणुकीसाठी जनजागृती सुरू आहे. 

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली