शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
6
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
7
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
8
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
9
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
10
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
11
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
12
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
13
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
14
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
15
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
16
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
17
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
18
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
19
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
20
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी प्रकल्पातून अत्यल्प सिंचन

By admin | Updated: May 25, 2015 01:53 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.

गडचिरोली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रयत्नाने चामोर्शी तालुक्यात दिना (कन्नमवार जलाशय) प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यातूनच पाणीसाठा उपसा करून रेगडी गावातील १७० व विकासपल्ली गावातील १८० हेक्टर क्षेत्रास सिंचन करण्याच्या दृष्टीने रेगडी विकासपल्ली ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची असून मागील चार वर्षात केवळ ३० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन या योजनेमुळे होऊ शकले. या योजनेचे अनेक किरकोळ काम सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले आहे. राज्य सरकारचे ही योजना पूर्ण करण्याकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच शेती करीत आहे.
११ एप्रिल १९९० ला ६८.७३ लक्ष रूपये किमतीच्या रेगडी विकासपल्ली उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर योजनेची सिंचन क्षमता ६४७ हेक्टर राहणार होती. सन २०१४-१५ पर्यंत पूर्वीचा शिल्लक धरून ७२.६७ लक्ष रूपयांचा निधी या योजनेकरिता मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाकरिता १४.९२० हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता असून जमीन संपादित करण्यात आली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. ६८.७३ लक्ष रूपये निधीच्या मूळ प्रस्तावास ११ एप्रिल १९९० ला मान्यता देण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाची ठरवलेली ही किंमत १९८८-८९ च्या दरसूचीनुसार निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर सुधारित मान्यतेसाठी व वाढीव निधीच्या रकमेसह प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १०५२.०० लक्ष रूपये होती.
आॅक्टोबर २०१४ अखेरपर्यंत ९३३.३६ लक्ष रूपये या उपसा सिंचन योजनेवर खर्च झाले. प्रकल्पाची सिंचन क्षमता ६४७ हेक्टरची आहे. मात्र योजनेचे शिर्षकामे पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये चाचणी करण्यात आली. त्यानंतर सलग चार वर्षे सिंचन क्षमतेपेक्षा अत्यल्प सिंचन या उपसा सिंचन योजनेतून झालेले आहे. २०११-१२ मध्ये केवळ ३४ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ३५ हेक्टर तर २०१३-१४ मध्ये केवळ दोन हेक्टर व २०१४-१५ मध्ये ३० हेक्टर सिंचन या योजनेतून झाले. सदर योजनेवर ९० अश्वशक्तीचे चार पंप आहे. पैकी दोनच पंप कार्यान्वित होते. दोनपंपाचे स्टॉर्टर बंद स्थितीत असल्याने व एका पंपाची वायरिंग जळालेली असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. योजनेची कामे पूर्ण झाले असून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे सुधारित प्रशासकीय मान्यता असल्याचे कळविले नसल्याने प्रकल्पाचे किरकोळ दुरूस्ती काम सध्या बंद झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)