शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे विक्रीत पशुपालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या दलालाचे कनेक्शन अड्याळ व नागपूर येथील मोठ्या कसायाशी असल्याची चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देभाकड व देशी गायीला पसंती : लॉकडाऊनमध्ये कसाई घेताहेत गैैरफायदा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णत: कोलमडली आहे. दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील पशुपालकांच्या भाकड व देशी गायींवर कसायांची नजर आहे. पशुपालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कसाई अत्यल्प किमतीत भाकड व देशी गायीची खरेदी करीत आहेत. परिणामी या व्यवहारात पशुपालकांची आर्थिक लूट होत आहे.पाळीव जनावरे खरेदी-विक्रीत पशुपालकांची लूट होत असल्याचा हा प्रकार कोरची, देसाईगंज, व कुरखेडा तालुक्यातही वाढला आहे. सावंगी नजीकच्या गांधीनगर गावात दोन इसम गाय खरेदीचा व्यवहार करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या व्यवहारात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या दलालाचे कनेक्शन अड्याळ व नागपूर येथील मोठ्या कसायाशी असल्याची चर्चा सुरू आहे.कोरोना लॉकडाऊनच्या काळात गायीच्या खरेदी-विक्री व्यवहाराला चांगला उत आला आहे. अत्यल्प किमतीत शेतकऱ्यांकडून भाकड व देशी गायी खरेदी करून ही जनावरे मोठ्या कसायापर्यंत वाहनांद्वारे पोहोचविले जात आहेत.पूर्वी शेतीच्या कामात पाळीव जनावरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आता गाय, बैैल, म्हैैस व इतर पाळीव जनावरे जंगलात नेऊन चारण्यासाठी गुराखी मिळत नाही. परिणामी त्यांच्या देखभाल व पोषणाची जबाबदारी सांभाळणे शेतकºयांना कठिण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्याकडील पाळीव जनावरे व्यापाºयांना विकत आहेत.कुपोषित, हाळकुडे जनावरे कसायांना अल्प किमतीत विकून पशुपालक तणावमुक्त होत आहेत. अनेक शेतकरी ट्रॅक्टर व इतर यंत्राचा वापर करून विकसीत शेती करीत आहेत. परिणामी गेल्या तीन- चार वर्षात उत्तर भागासह गडचिरोली जिल्ह्यात पशुधन घटले आहे.दलालांचे पोलिसांशी साटेलोटे?गेल्या दोन वर्षांपासून देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून पाळीव जनावरे कसाई वाहनामध्ये भरून मोठ्या प्रमाणात नेत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात वाहनांची तपासणी केली जात असल्याने हा प्रकार अत्यंत कमी झाला आहे. मात्र त्यापूर्वी कत्तलीसाठी अनेक जनावरे नेण्यात आली. यात दलालांचे पोलिसांशी साटेलोटे असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :cowगाय