शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसम्राटांची जिल्ह्याच्या सीमेवर नजर

By admin | Updated: March 16, 2015 01:13 IST

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले.

देसाईगंज : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १ एप्रिलपासून दारूबंदी करण्याची घोषणा शासनाने केली. याबाबत गृह विभागाने १० मार्चला शासन परिपत्रक निर्गमित केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांच्या नजरा आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात भंडारा, गोंदिया जिल्ह्यावर खिळल्या आहेत. आतापासूनच मद्यसम्राटांनी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जागेचा व गावाचा शोध घेणे सुरू केले असून जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या हालचाली वाढल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूचा महापूर वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होणार असल्याचे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले. या परिपत्रकातून चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यसम्राटांना त्यांचे दारूदुकान कायद्याने दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा सोडून राज्यात इतरत्र कुठेही प्रचलित नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असा दिलासाही दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर, सोनी (चपराड) व गोंदिया जिल्ह्यातील अरूणनगर, महागाव, सिरोली, मांडोखाल व अर्जुनी-मोरगाव या गावाला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही मद्यसम्राटांनी वणी शहराकडे दारू दुकाने थाटण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. मात्र वणी शहरात दारू दुकानांची गर्दी वाढून जमिनी कमी पडत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील काही मद्यसम्राटांनी आपले दारू दुकान लावण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा भागात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात हालचाली वाढविल्या आहेत. चंद्रपुरातील मद्यसम्राटांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे प्रथम अर्ज करावे लागणार आहे. त्यात त्यांची अनुज्ञपी कोणत्या जिल्ह्यात सुरू करणार याबाबत त्यांना उल्लेख करावा लागणार आहे. हे अर्ज आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांना ते आपल्या अभिप्रायासह अंतिम आदेशासाठी शासनाकडे पाठवावे लागणार आहे. वर्धा, गडचिरोली व त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होत असल्याने मद्यसम्राट गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. इतर जिल्हे मद्यसम्राटांना दूर पडतात. त्यामुळे मद्यसम्राट गोंदिया व भंडारा जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविणार असल्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)