शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

हलक्या धानपिकाचे नुकसान

By admin | Updated: October 26, 2014 22:40 IST

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. अनेक ठिकाणच्या हलक्या धानपिकाची स्थिती अतिशय दुरवस्थेत आहे. त्यामुळे हाती आलेले धानपीक नष्ट होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात तळीबोडी ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी शेतकरी जड धानपीक घेतात. परंतु ज्या भागात पाण्याच्या स्त्रोतांचा अभाव आहे, अशा ठिकाणी शेतकरी १५ ते २५ दिवस लवकर उत्पन्न निघेल, अशा धानपिकाची पेरणी करतात. जिल्ह्यात हलक्या धानपिकाच्या परेणीचे क्षेत्र जवळपास २५ टक्के आहे. सध्य:स्थितीत हलके धानपीक कापणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी करून बांधणीही केली आहे. तर मध्यमप्रतीचे धानपीक सध्य:स्थितीत अनेक शेतात उभे आहे. त्यामुळे मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका या धानपिकाला बसत आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज, वासाळा, डोंगरगाव, ठाणेगाव, चामोर्शी माल, वणखी त्याबरोबरच वैरागड परिसरातीलही करपडा, लोहारा, सिर्सी, गणेशपूर परिसरातील हलके धानपीक कापून बांधणी करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यातील दिभना, जेप्रा, राजगाटा, आंबेशिवणी, उसेगाव, भिकारमौशी, अमिर्झा, चांभार्डा, टेंभा, मरेगाव, मौशीखांब परिसरातील हलके धानपीक येत्या आठ दिवसात कापणीच्या तयारीत होते. परंतु दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानाची कापणी थांबली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाच्या कडपाही भिजल्या आहेत. त्याबरोबरच मध्यप्रतीचे धानपीक वादळवारा व पावसामुळे पूर्णत: जमिनीला टेकले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका या धानाला बसणार आहे. ज्या धानपीकाची कापणी करून कडपा वाळविण्यासाठी ठेवल्या आहेत, अशा धानपिकाला पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच पावसामुळे धानाला भावही कमी मिळू शकतो, अशी शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)