प्राणहिता नदीपात्रात दीपदान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:07+5:302021-02-05T08:48:07+5:30

सिराेंचा : सिराेंचा तालुकास्थळी असलेल्या प्राणहिता नदीपात्रात दीपदान कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. गुरूवारपासून हा कार्यक्रम सुरू झाला. येथे गंगामातेची ...

Lighting program in Pranhita river basin | प्राणहिता नदीपात्रात दीपदान कार्यक्रम

प्राणहिता नदीपात्रात दीपदान कार्यक्रम

सिराेंचा : सिराेंचा तालुकास्थळी असलेल्या प्राणहिता नदीपात्रात दीपदान कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. गुरूवारपासून हा कार्यक्रम सुरू झाला. येथे गंगामातेची मनाेभावे पूजाअर्चा करून नदीपात्रात तेल व तुपाचे दिवे प्रज्वलित करून साेडण्यात आले.

गुरुपुष्यामृत योग वर्षांनी येतो. अशा पवित्र पर्वावर गंगामातेचे दर्शन, पूजन करून दीपदान केल्याने सुख, शांती, पुण्याईचे फळ मिळते. गावाच्या समृद्धीच्या दृष्टीने उत्तम कार्य असल्याचे पंडित सचिन वेदांतम यांच्याकडून सांगण्यात आले. या पर्वाचे संकल्प पंडित सचिन वेदांतम यांनी केले. विधिवत पौरोहित्य तेलंगणातील कालेश्वर येथील श्रध्देय रविशंकर महाराज यांनी केले. उपस्थित सर्व महिला व पुरुषांनी दीप प्रज्वलित करून नदीपात्रात सोडले. जवळपास दोन हजार दीपप्रज्वलन करण्यात आले. गंगेची आरती करून उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित तिपट्टी, रामकोटया वेदांतम, रामन्ना कडारला, रेखा तिपट्टी आदींनी सहकार्य केले.

Web Title: Lighting program in Pranhita river basin