शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जवानांनी गिरविले योगाचे धडे

By admin | Updated: June 19, 2016 01:16 IST

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने पोलीस ...

पोलीस मुख्यालयात शिबिर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यगडचिरोली : २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य धाम येथे शुक्रवारपासून योग व प्राणायम शिबिराला प्रारंभ झाला आहे. या शिबिराच्या माध्यमातून पोलीस जवान व कर्मचारी योगाचे धडे गिरवीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस जवान व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवनमान अतिशय ताणतणाव व धकाधकीचे असून बहुतांश कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून अलिप्त राहावे लागते. परिणामी अशा कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढते. सदर बाब गंभीर असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताणतणाव कसे घालविता येईल, तसेच सकारात्मकदृष्ट्या आनंदी जीवन कसे जगता येईल, या उद्देशाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी योग व प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात योग प्रशिक्षक हेमंत सेता व माधुरी या पोलीस जवानांना योग व प्राणायमचे प्रशिक्षण देत आहेत. या शिबिरात पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमधून जेटीएससी प्रशिक्षणासाठी आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक व शारीरिक बदल घडवून त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राणायम शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिराचा समारोप २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)