सुरजागड यात्रेत मोठी गर्दी, पहाडावर ठाकुरदेवाची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:38+5:302021-01-08T05:58:38+5:30

पहिल्या दिवशी नागरिकांचे आगमन, बिदिया पूजा, दुसऱ्या दिवशी दि.५ ला घटस्थापना, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात्रेचा तिसरा दिवस मुख्य असतो. ...

Large crowd in Surjagad Yatra, worship of Lord Thakur on the hill | सुरजागड यात्रेत मोठी गर्दी, पहाडावर ठाकुरदेवाची पूजा

सुरजागड यात्रेत मोठी गर्दी, पहाडावर ठाकुरदेवाची पूजा

पहिल्या दिवशी नागरिकांचे आगमन, बिदिया पूजा, दुसऱ्या दिवशी दि.५ ला घटस्थापना, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात्रेचा तिसरा दिवस मुख्य असतो. या यात्रेत सुरजागड इलाक्यातील नागरिक एकत्र येऊन गोटूलजवळील ठाकुरदेवाच्या मंदिरात पूजा करतात. तसेच काही ठराविक आदिवासी बांधव, पुजारी, भुमिया, गावपाटील सुरजागड पहाडीवर चढून ठाकुर देवाची पुजा करतात. यावेळी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचा आशीर्वाद मागितला जातो. ठाकुर देवाला, कोंबड्या व बकऱ्यांचा बळी देऊन पूजा केली जाते.

या यात्रेच्या यशस्वितेकरिता गोटूल समितीचे सैनू गोटा, सोमजी सडमेक, कल्पना आलाम, लक्ष्मण नवडी, बाबूराव पुंगाटी, पत्तू पोटावी यांच्यासह गोटूल समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यात्रेत पोलीस विभाग, आरोग्य विभाग, मुक्तिपथ यांच्याकडून स्टॉल लावून मोफत आरोग्य तपासणीसह विविध माहिती देण्यात आली.

सुरजागड प्रकल्पाला विरोध

यात्रेत ग्रामसभेकडून आदिवासी बांधवांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. आदिवासी पारपरिक नृत्य, रेला तसेच आदिवासी समाजाची संस्कृती दर्शविणारे संपूर्ण छायाचित्र एका गोटूलमध्ये लावले होते. तसेच ग्रामसभेचा ठराव घेऊन सुरजागड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली.

तंबाखू व खर्रामुक्त यात्रा

प्रथमच मुक्तिपथच्या सहकार्याने नागरिकांत जनजागृती करून ही यात्रा तंबाखू व खर्रामुक्त करण्यावर भर देण्यात आला. या यात्रेत खर्ऱ्याचे एकही दुकान नव्हते. पहिल्यांदाच या यात्रेत खर्रा विक्रीविरुद्ध एवढे सकारात्मक वातावरण पहायला मिळाले.

धर्मरावबाबांकडून पूजा

सुरजागड यात्रेत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी येऊन ठाकुर देवाचे पूजन केले, यावेळी सोबत भाग्यश्री आत्राम होत्या.

..................‘सुरजागड, जल, जंगल, जमीन हमारा है,’ असा नारा देताना ग्रामसभेचे सैनू गोटा व इतर.

Web Title: Large crowd in Surjagad Yatra, worship of Lord Thakur on the hill