भगवानपूर येथे काेया पुनेम संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST2021-02-06T05:08:58+5:302021-02-06T05:08:58+5:30

कुरखेडा : तालुक्यातील भगवानपूर येथे जय गोंडवाना बिरसा मुंडा गोटूल समितीच्या वतीने कोया पुनेम संमेलन व भगवान बिरसा मुंडा ...

Kaeya Punem Sammelan at Bhagwanpur | भगवानपूर येथे काेया पुनेम संमेलन

भगवानपूर येथे काेया पुनेम संमेलन

कुरखेडा : तालुक्यातील भगवानपूर येथे जय गोंडवाना बिरसा मुंडा गोटूल समितीच्या वतीने कोया पुनेम संमेलन व भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी हाेते. उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हरिराम वरखडे, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, भगवान मडावी, रामचंद्र काटेंगे, मोतीराम वट्टी, फागोजी तुलावी, प्रल्हाद धारणे, फाल्गून चौके उपस्थित होते. यावेळी आमदार डाॅ. होळी यांनी आदिवासींनी आपली विशिष्ट बोलीभाषा व संस्कृतीचा अभिमान बाळगून त्याची जोपासना करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुमरे व राजू परसे यांनी केले. आभार धनराज हलामी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरविंद तुलावी, देवराव उसेंडी, विनाजी तुलावी, हिवराज कोल्हे, विनोद काटेंगे, नीलेश तुलावी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Kaeya Punem Sammelan at Bhagwanpur