अहेरी उपविभागात अवैध वाहतूक जोरात

By Admin | Updated: May 28, 2015 01:04 IST2015-05-28T01:04:11+5:302015-05-28T01:04:11+5:30

आलापल्ली -सिरोंचा, आलापल्ली -भामरागड मार्गावर दिवसेंदिवस खासगी वाहनाद्वारे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून अवैद्य वाहतूक जोरात सुरु आहे.

Invalid traffic in Aheri subdivision loud | अहेरी उपविभागात अवैध वाहतूक जोरात

अहेरी उपविभागात अवैध वाहतूक जोरात

अहेरी : आलापल्ली -सिरोंचा, आलापल्ली -भामरागड मार्गावर दिवसेंदिवस खासगी वाहनाद्वारे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून अवैद्य वाहतूक जोरात सुरु आहे. यामागे पोलिसांचा आशिर्वाद असल्याचे दिसून येत आहे.
आलापल्ली हे दक्षिण गडचिरोली भागाचे मुख्य केंद्र आहे. येथून पाच तालुक्याचा व्यवहार चालतो. अनेक लोक खरेदीसाठी आलापल्लीच्या बाजारपेठेत येतात. येथे खासगी काळी-पिवळी वाहनांची संख्या ७० ते ८० च्या घरात आहे. कमी वेळात जास्तीत जास्त प्रवासी कोंबून नेले जातात. अशा प्रकारात प्रवाशांना जीवही मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आलापल्ली व अहेरीकरीता दोन वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. परंतु त्यांचा अर्धा दिवस अहेरी व उर्वरित दिवस आलापल्लीत जातो. आता तर ते दुर्मिळच झाले आहे. त्यामुळे अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Invalid traffic in Aheri subdivision loud