शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिली तंत्रज्ञानाची माहिती

By admin | Updated: March 15, 2015 01:15 IST

जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नवेगाव (वेलगूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले.

अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नवेगाव (वेलगूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती रवीना गावडे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती सोनाली कंकडालवार, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, लैजा चालुरकर, पं. स. सदस्य आत्माराम गद्देकर, सुखदेव दुर्योधन, यमुना आत्राम, ऋषी पोरतेट, वेलगूरचे सरपंच लालू करपेत, उसरपंच उमेश मोहुर्ले, पोलीस पाटील मनोहर चालुरकर, किष्टापूरचे सरपंच भगवान आत्राम, उपसरपंच अशोक येलमुले, पोलीस पाटील महेश अर्का, वेलगूरचे पोलीस पाटील प्रभाकर शेंडे, अहेरीचे बीडीओ सुभाष चांदेकर, जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला वेलगूर परिसरातील दहा गावचे नागरिक उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान कृषी तज्ज्ञांनी रोवणी यंत्र, चिखल यंत्र, धान कापणी, मळणी यंत्राच्या वापराचे फायदे, ते कसे वापरावे याची माहिती दिली. त्याचबरोबर मानव विकास मिशनच्या माध्यमातून सदर यंत्र अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. हे यंत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.मेळाव्याचे प्रास्ताविक कृषी अधिकारी वाय. बी. पदा यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी एस. के. फुलझेले तर आभार विस्तार अधिकारी पी. आर. रायपुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी सी. डी. संदुकवार, किष्टापूरचे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यासह वेलगूर, नवेगाव येथील नागरिकांनी सहकार्य केले. मेळाव्याला दहाही गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)