शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यात योजनांची माहिती व नागरिकांचे जनजागरण

By admin | Updated: December 25, 2015 02:11 IST

पोलीस प्रशासनाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील बामनपेट तसेच कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला.

बामनपेट व पलसगड येथे कार्यक्रम : कबड्डी, खो- खो, व्हॉलिबॉल, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस; गरजूंना साहित्य वितरितआष्टी/ पलसगड : पोलीस प्रशासनाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील बामनपेट तसेच कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांचे जनजागरण करण्यात आले. आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत बामनपेट येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वन परिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संदीप शिंगटे, संजू पंदिलवार, गणेश शिंगाडे, उपसरपंच रवींद्र कोवे, भांडेकर, आर. अनुतुलवार, नायब तहसीलदार बावणे, विजय बहेरवार, वैशाली कन्नाके उपस्थित होते. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ठाणेदार बेसरकर यांनी केले. वन व वन्य जीवाचे संरक्षण करून सहकार्य करावे, असे आवाहन तनपुरे यांनी केले. यावेळी धर्मराव हायस्कूल अडपल्लीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यशस्वीतेसाठी डी. डी. रॉय, संघरक्षित फुलझेले, प्रमोद उंदीरवाडे, मुनिश्वर रात्रे, मिलींद एलावार, गौरकार, गुरनुले, भसारकर, बसू यांनी सहकार्य केले. कुरखेडा तालुक्यातील पोलीस स्टेशन पुराडा अंतर्गत पलसगड येथे बुधवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन समाजकल्याण अधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते यावेळी अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. मडकवार होते. यावेळी पं. स. सभापती शामिना उईके, आशिष नंदनवार, शिक्षण विस्तार अधिकारी एच. आर. भैसारे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक महिपाल सिंग उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान रांगोळी, व्हॉलिबॉल, कबड्डी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोखरक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत गरजूंना विविध साहित्य वितरित करण्यात आले. यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक तांदळे, पोलीस उपनिरीक्षक कवडे, गुसिंगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)