मुरूमगावात वाढला वीज पुरवठ्याचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:43 IST2021-09-04T04:43:39+5:302021-09-04T04:43:39+5:30

मुरूमगाव येथे ३० वर्षांपासून स्वतंत्र विद्युत उपकेंद्र आहे. बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती. परंतु काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार ...

Increased power supply in Murumgaon | मुरूमगावात वाढला वीज पुरवठ्याचा लपंडाव

मुरूमगावात वाढला वीज पुरवठ्याचा लपंडाव

मुरूमगाव येथे ३० वर्षांपासून स्वतंत्र विद्युत उपकेंद्र आहे. बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती. परंतु काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. विशेष म्हणजे, हा परिसर जंगलव्याप्त आहे. त्यामुळे वादळवारा सुटल्यानंतर वीजपुरवठा खंडित हाेताे. येथील कनिष्ठ अभियंता मुख्यालयी राहत नाही.

काेटगूल परिसरातील ४८ गावे मुरूमगाव उपकेंद्रांतर्गत येतात. याच उपकेंद्रातून ३३ केव्ही व ११ केव्हीची लाईन गेलेली आहे. दाेन्ही लाईन क्लिअर करून ठेवणे आवश्यक आहे. परंतु वेळीच उपाययाेजना हाेत नसल्याने वीजपुरवठा खंडित हाेताे. मुरूमगाव येथे शाळा, शासकीय कार्यालये तसेच व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तेथील काम ठप्प पडते. याशिवाय येथील बीएसएनएलचा कव्हरेज वारंवार विस्कळीत हाेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Increased power supply in Murumgaon