बांबू लागवड करून उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:46+5:30

उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, माणगा, बालकोवा, ब्रानडीसी, न्यूटन्स, अ‍ॅप्सपर, टुल्डा आदी प्रकारचे बांबू रोपे उपलब्ध आहे.

Increase yield by planting bamboo | बांबू लागवड करून उत्पन्न वाढवा

बांबू लागवड करून उत्पन्न वाढवा

googlenewsNext
ठळक मुद्देरोपे उपलब्ध : नितीन कावडकर यांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत बांबू टिश्यू कल्चर रोपे लागवडीसाठी यंदाच्या पावसाळ्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे, असा सल्ला महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे गडचिरोली वनवृत्ताचे समन्वयक नितीन कावडकर यांनी केले आहे.
उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, माणगा, बालकोवा, ब्रानडीसी, न्यूटन्स, अ‍ॅप्सपर, टुल्डा आदी प्रकारचे बांबू रोपे उपलब्ध आहे. सदर योजनेअंतर्गत शेतकºयांना ५० टक्के सबसीडी मिळणार आहे. अनुदानाची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.
लागवडीच्या पहिल्या वर्षी अनुदानाची ५० टक्के रक्कम दोन हप्त्यात तर लागवड पूर्ण झाल्यावर व १०० टक्के रोपे जिवंत असल्याची खात्री झाल्यावर उर्वरित ५० टक्के अनुदान मार्च महिन्यात देण्यात येणार आहे. याचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे कावडकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Increase yield by planting bamboo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.