सिराेंचा तालुक्यात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST2021-06-10T04:25:09+5:302021-06-10T04:25:09+5:30

धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तहसीलदार सय्यद हमीद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील, संवर्ग विकास ...

Inauguration of paddy procurement center in Siraencha taluka | सिराेंचा तालुक्यात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

सिराेंचा तालुक्यात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तहसीलदार सय्यद हमीद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील, संवर्ग विकास अधिकारी सतीश चिटकुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, विपणन निरीक्षक जे. ए. तलांडी आदी उपस्थित होते.

उन्हाळी धानाच्या खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर राखून व कोरोनाविषयी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी, असे आवाहन केले.

यावेळी ग्रेडर अनंत अलाम मदनय्या मादेशी, एम.डी.शानू, रामकिष्टू नीलम, देवय्या येनगंदुला, नागरेड्डी गोडीमेटला, मिस्त्री सुधाकर, मुलबुरी भास्कर आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of paddy procurement center in Siraencha taluka