वांगेपल्ली येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:07+5:302021-02-05T08:51:07+5:30

अहेरी : वांगेपली गेर्रा येथे जय पेरसापेन क्रिकेट मंडळाच्या वतीने टेनिस बाॅल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे ...

Inauguration of cricket tournament at Wangepalli | वांगेपल्ली येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वांगेपल्ली येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अहेरी : वांगेपली गेर्रा येथे जय पेरसापेन क्रिकेट मंडळाच्या वतीने टेनिस बाॅल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं. स. सभापती भास्कर तलांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ईश्वर सिडाम, दिलीप मडावी, अमित देशपांडे, महेश नैताम, राजू सिडाम, सडमेक, बाबूराव नागापुरे, साईनाथ सडमेक उपस्थित होते. प्रास्ताविक अमर सडमेक, सूत्रसंचालन पिंटू तोडसाम तर आभार कैलाश आत्राम यांनी मानले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष समीर मडावी, उपाध्यक्ष रिजवान सिडाम, सचिव शैलेश मडावी, कोषाध्यक्ष कपिल आत्राम, विनोद पोरतेट, पिंकू मडावी, रूपेश मडावी, गणेश मडावी, मिथुन सिडाम, प्रभाकर मडावी, राकेश सिडाम, रतन मडावी, राजू सिडाम, मनोज मडावी, विशाल मडावी, विकास मडावी, अक्षय कुसराम, समीर मडावी उपस्थित हाेते.

Web Title: Inauguration of cricket tournament at Wangepalli