शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास कारावास

By admin | Updated: January 14, 2017 00:51 IST

भुलथापा देत पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.

जिल्हा न्यायालयाचा निकाल : २०१४ मध्ये गोमणीत घडली होती घटनागडचिरोली : भुलथापा देत पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. बोंदाजी वारलू दिवटीवार (४२) रा. गोमणी ता. मुलचेरा असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील आंध्रप्रदेश राज्यात लग्नसमारंभासाठी गेले होते. यावेळी आरोपी बोंदाजी दिवटीवार याने ६ जुलै २०१४ रोजी मुलीच्या घरी जावून घरातील दागीण्यांचा डब्बा हरविल्यामुळे लगाम येथील पुजाऱ्याकडे गेल्यास डब्बा मिळेल, अशी बतावणी करून स्वत:च्या दुचाकीवर बसवून तिला आलापल्ली मार्गाने जंगलामध्ये घेवून गेला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या बाबत कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला सिरोंचा येथे घेवून गेला व तिथेही अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दामपूर येथील बसस्थानकावर सोडून दिला. पीडित मुलगी आपल्या नातेवाईकासोबत आपल्या घरी आली व घडलेली हकीकत आपल्या आईस सांगितली. पीडित मुलीच्या आईने मुलचेरा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मुलचेरा पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३६३, ३६६, ३६७, ३७६, ५०६ भादंवि व कलम ४, ५ बाललैंगिक अत्याचार संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यानंतर ८ जुलै २०१४ रोजी आरोपी बोंदाजी दिवटीवार याला अटक करण्यात आली.गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात साक्षीदारांचे बयाण नोंदविल्यानंतर तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून शुक्रवार १३ जानेवारी रोजी आरोपीस ७ वर्ष कारावास व २ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी केला. (प्रतिनिधी)