शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील धानाला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते.

ठळक मुद्देधानपीक कुजले : सखल भागातील धानाची परिस्थिती गंभीर, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यात तब्बल सहा दिवस पाऊस आणि पुराच्या पाण्याने थैमान घातले. पुराचे पाणी धानपिकात शिरल्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे पाणी या शेतीमध्ये शिरते. यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल सहा दिवस पूर परिस्थिती कायम होती. सहा दिवस धानाच्या बांध्यांमध्ये पाणी शिरले असल्याने पीक बुडून होते. त्यामुळे ते आता करपल्यासारखे झाले आहे. तसेच पुराच्या पाण्याची गाळ धान पिकावर साचली आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने पानांवर साचलेले गाळ कायम राहणार आहे. याचा मोठा फटका धानपिकाला बसण्याची शक्यता आहे. कधीकधी पाण्याअभावी धानपीक करपते. तर कधी पुरामुळे फटका बसते.नुकसानीचे पंचनामे होणारसहा दिवस असलेल्या पुरामुळे शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही पाळीव प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. अजूनपर्यंत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. मात्र महसूल विभागामार्फत नुकसानीचा पंचनामा केला जाईल. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी दिली.

टॅग्स :floodपूरagricultureशेती