शेकडो नागरिक सत्यवानरावांच्या समाधिस्थळावर झाले नतमस्तक

By Admin | Updated: July 18, 2015 01:31 IST2015-07-18T01:31:46+5:302015-07-18T01:31:46+5:30

सकाळी सत्यवानरावांच्या राजघाटावरील समाधीस्थळावर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुष्पचक्र वाहून वडिलांना आदरांजली वाहिली.

Hundreds of civilians went to the temple of Satyawan Rao | शेकडो नागरिक सत्यवानरावांच्या समाधिस्थळावर झाले नतमस्तक

शेकडो नागरिक सत्यवानरावांच्या समाधिस्थळावर झाले नतमस्तक

सकाळी सत्यवानरावांच्या राजघाटावरील समाधीस्थळावर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुष्पचक्र वाहून वडिलांना आदरांजली वाहिली. यावेळी राजपरिवारातील सदस्य व पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अवधेशरावबाबा, प्रवीणबाबा आत्राम, प्रकाश गेडाम, अरूण लोखंडे, प्रकाश गुडेल्लीवार, क्रिष्णा मंचालवार, सचिन पेदापल्लीवार, विलास खरवडे, प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जि. प. सदस्य नंदा दुर्गे, शारदा ऐगोलपवार, पंचायत समिती सभापती रवनी गावडे, पंचायत समिती सदस्य सुनीता मंथनवार, उपसरपंच स्वाती येनगंटीवार, शंकर मगडीवार, अमोल गुडेल्लीवार, किशोर मंथनवार, श्रीनिवास चटारे, दिनेश येनगंटीवार, पप्पु मद्दिलवार, प्रतीक मुधोळकर, मयूर गुमलवार, रवी नेलकुद्री, पवन गद्देवार, गब्बास बेग, निस्सार सय्यद, प्रशांत पत्तीवार, बाळू ओडेट्टीवार, नूर महम्मद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपंगांना अहेरी येथील रूग्णालयात प्रमाणपत्र मिळेल याची सुविधा केली जाईल, अहेरी येथे रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राची स्थापना केली जाईल, असे जाहीर केले.

Web Title: Hundreds of civilians went to the temple of Satyawan Rao