शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालय हाऊसफूल्ल

By admin | Updated: September 18, 2014 23:34 IST

दमट वातावरणामुळे ग्रामीणसह शहरी भागातही डेंग्यू, हिवताप, टायफाईड, फायलेरिया, काविळ, अतिसार आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे रूग्णांचा ओढा जिल्हा सामान्य

ग्रामीण भागातूनही रूग्णांचा ओढा : डेंग्यू, मलेरिया रोगांची साथ गडचिरोली : दमट वातावरणामुळे ग्रामीणसह शहरी भागातही डेंग्यू, हिवताप, टायफाईड, फायलेरिया, काविळ, अतिसार आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. त्यामुळे रूग्णांचा ओढा जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढला असल्याने संपूर्ण रूगणालय हाऊसफूल्ल झाले आहेत. मागील आठ दिवसात सुमारे १२०० रूग्ण दाखल झाले आहेत. मागील आठवड्यात झालेला दमदार पाऊस त्यानंतर प्रचंड प्रमाणात वाढलेला उकाडा यामुळे तापाचे रूग्ण, साथीच्या आजाराचे रूग्ण यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागामध्ये असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्येही सोयीसुविधांची वाणवा आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बहुतांश रूग्ण गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होऊन उपचार घेतात. त्याचबरोबर चंद्रपूर, भंडारा व छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण याच रूग्णालयाला पसंती दर्शवितात. या सर्व कारणांमुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात मागील आठवड्यात दाखल होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चालू आठवड्यात सुमारे १२०० रूग्ण दाखल झाले आहेत. रूग्णालयात केवळ २०० खाटांची व्यवस्था आहे. त्यामुळे इतर रूग्णांना वार्डात व वऱ्हांड्यात जमिनीवर खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. रूग्ण व नातेवाईकांच्या गर्दीमुळे संपूर्ण वार्ड नागरिकांनी हाऊसफूल्ल झाले आहेत. डॉक्टरांनाही उपचार करण्यासाठी रूग्णांना ओलांडून गेल्याशिवाय पर्याय नाही. सामान्य रूग्णालयातील बहूतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. तापाच्या आजाराचे रक्ताचे नमुणेही घ्यावे लागतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या रक्तपेढीवरही भार वाढलेला आहे. बाहेरगावच्या रूग्णालयातून रेफर केलेले अनेक गंभीर रूग्णही जिल्हा सामान्य रूग्णालयात आहेत. याशिवाय संसर्गजन्य आजाराचेही अनेक रूग्ण दाखल होत असल्याने रूग्णालयाच्या दैनंदिन यंत्रणेवरचा भार वाढत आहे. रूग्णालयात औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात असला तरी बरेच पेशंट बाहेर औषध खरेदीसाठी जातात. (नगर प्रतिनिधी)