जड वाहनांमुळे आष्टीत हाेते वाहतुकीची काेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:11+5:302021-02-05T08:53:11+5:30

गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात ...

Heavy vehicles cause heavy traffic in Ashti | जड वाहनांमुळे आष्टीत हाेते वाहतुकीची काेंडी

जड वाहनांमुळे आष्टीत हाेते वाहतुकीची काेंडी

गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. वाहन वळताना मागे येणाऱ्या वाहनधारकांना धाेका हाेण्याची शक्यता असते. अपघाताचा धोका ओळखून या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी नागरिकांची आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाने दिवसभर ट्रेलर व जड वाहनांची वर्दळ असते. तसेच मुख्य चौक असल्याने या ठिकाणी सायंकाळी बरीच गर्दी असते. बऱ्याचदा पुतळ्याच्या संरक्षक भिंतीला वाहनांनी धडक दिलेली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून चौकातील रुंदीकरण करण्याची नितांत गरज आहे. परंतु वाहनांच्या गतीवरील नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बरीच जड वाहने दुकानाच्या समोर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडसर येताे. सध्या चामाेर्शी ते येनापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. एका बाजूने रस्त्याचे खाेदकाम करण्यात आल्याने वाहतुकीलासुद्धा अडथळा येत आहे. नागरिकांना खाेदलेल्या जागेवर धुळीचा त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे श्वसनाचेही आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील वाहनांची वर्दळ लक्षात घेता, चाैकाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Heavy vehicles cause heavy traffic in Ashti