शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्रातील प्रसूतिगृह नावापुरतेच

By admin | Updated: January 4, 2015 23:12 IST

जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृहे बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव

गडचिरोली : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृहे बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर माताना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.
बालमृत्यू व मातामृत्यूचा होणारा धोका टाळण्यासाठी शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिलेची प्रसूती रूग्णालयातच व्हावी, यासाठी प्रचंड प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याचा परिणाम म्हणजे, अलीकडच्या दोन ते तीन वर्षांपासून रूग्णालयात प्रसुती होण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश गरोदर माता स्वत:हून प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल होतात.
गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर १५ ते २० किमी राहत असल्याने एवढ्या दूर अंतरावर गरोदर मातेला नेणे शक्य होत नाही. त्यामुळे उपकेंद्रांमध्येच प्रसूतीची व्यवस्था शासनाकडून केल्या गेली आहे. त्यासाठी प्रसूती केंद्रांच्या प्रत्येक इमारतीत प्रसूतिगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३७६ आरोग्य उपकेंद्र आहेत. यापैकी ३५४ उपकेंद्रांना इमारती आहेत. या उपकेंद्रांच्या इमारतीत प्रसूती कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सदर प्रसूतिगृह आकाराने अत्यंत लहान आहे. बेड ठेवल्यानंतर जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे गरोदर मातेसह परिचारिकेलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांशवेळा एकाचवेळी दोन गरोदर माता दाखल झाल्यास यापैकी एका गरोदर मातेची बाहेर प्रसूती केल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. याचा अनुभव आजपर्यंत अनेकवेळा परिचारिकांना आला आहे. बऱ्याचवेळा बाहेर प्रसूती करण्यापेक्षा कुटुंबीय सदर गरोदर मातेला घरी नेऊन प्रसूती करतात.
प्रसूतिगृहातील या अडचणी शासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशस्त प्रसूतिगृह बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात आजपर्यंत ४९ प्रसूतिगृह बांधण्यात आले आहेत. नवीन प्रसूतिगृह बांधण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे पैसा उपलब्ध असला तरी बऱ्याच उपकेंद्रांमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे प्रसूतिगृहाचे बांधकाम होऊ शकले नाही. नवीन वसतिगृह बांधण्यासाठी शासनाला आगावूचा खर्च करावा लागत आहे. मात्र जोपर्यंत नवीन व प्रशस्त प्रसुतीगृह बांधण्यात येत नाही. तोपर्यंत गरोदर मातांना नरक यातना सहन कराव्याच लागणार आहेत. त्यामुळे नवीन प्रसूतिगृहांचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)