पालकमंत्री तेलंगणात पुष्कर मेळाव्याला लावणार हजेरी

By Admin | Updated: July 25, 2015 01:54 IST2015-07-25T01:54:15+5:302015-07-25T01:54:15+5:30

जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीचा शेवटचा प्रवास होतो. त्यानंतर तेलंगणा राज्यात गोदावरी नदी जाते.

Guardian Minister must attend Pushkar Mela in Telangana | पालकमंत्री तेलंगणात पुष्कर मेळाव्याला लावणार हजेरी

पालकमंत्री तेलंगणात पुष्कर मेळाव्याला लावणार हजेरी

गडचिरोली : जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीचा शेवटचा प्रवास होतो. त्यानंतर तेलंगणा राज्यात गोदावरी नदी जाते. पुष्कर मेळाव्याच्या निमित्ताने सिरोंचा तालुक्यासाठी शासनाकडून कोणताही निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे विदर्भातील भाविकांचा भ्रमनिराश झालेला असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम करिमनगर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे पुष्कर मेळाव्याला २५ जुलै रोजी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मपुरी, मंचेरियल येथील व्ही. व्येंकटेश्वरा टाऊन प्रेसिडेंट, हमालीवाडा येथे पालकमंत्र्यांचा कार्यक्रम राहणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम मार्गदर्शन करून त्यानंतर ते पुष्कर मेळाव्याला धर्मपुरी येथे हजेरी लावतील व येथूनच सरळ ते नागपुरकडे रवाना होऊन मुंबईला जातील. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Guardian Minister must attend Pushkar Mela in Telangana