शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ महोत्सवातून होणार उत्कृष्ट कलाविष्कार

By admin | Updated: January 3, 2015 23:03 IST

शिक्षण विभाग जिल्हा परिषद व माहिती तथा जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने २ ते ७ जानेवारीदरम्यान गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवातून विविध प्रकारचा

गडचिरोली : शिक्षण विभाग जिल्हा परिषद व माहिती तथा जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने २ ते ७ जानेवारीदरम्यान गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवातून विविध प्रकारचा उत्कृष्ट कलाविष्कार होणार आहे, अशी माहिती प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शनिवारला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रंथ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५ जानेवारीला सकाळी ८ वाजता शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचा सहभाग असलेली भव्य ग्रंथदींडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातील संत ज्ञानेश्वर नगरीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार ना. गो. गाणार, मितेश भांगडिया, प्रा. अनिल सोले, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदी मान्यवर उपस्थित राहतील.
याच दिवशी दुपारी १ ते ३ यावेळेत टीव्ही स्टार मिर्झा बेग यांचा कॉमेडी एक्सप्रेस हा विनोदी कार्यक्रम होणार आहे, अशीही माहिती शिक्षणाधिकारी नरड यांनी दिली. याच दिवशी कवी संमेलन व सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ६ जानेवारीला परिसंवाद, ७ जानेवारीला शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)