शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासमध्ये धान विकणाऱ्यांना बोनस द्या

By admin | Updated: January 9, 2016 01:55 IST

आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनंंगडचिरोली : आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु जे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांच्या मार्फतीने धान विक्री करतात अशांना बोनसचा लाभ मिळत नाही. परिणामी शेतकरी बोनसपासून वंचित राहतो. त्यामुळे कृबासमार्फत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रति क्विंटल २०० रूपये बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धान विकल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैशाची आवश्यकता असते. कृषी उत्पन्न बाजार समितीत त्वरित रक्कम मिळत असते. यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान विकून आपली गरज भागवितो. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकल्यानंतर रक्कम त्वरित मिळत नाही. अनेकदा दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना धान चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते. नाईलाजास्तव शेतकरी धान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्वरित पैसे मिळण्याच्या हेतूने विकतात. आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांना येत असते. अशा शेतकऱ्यांना शासकीय धोरणानुसार घेण्यात येणाऱ्या बोनसचा लाभ मिळत नाही. यात गरीब, गरजू शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सदर नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रूपये प्रतिक्विंटल बोनसचा लाभ द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या संदर्भात राकाँतर्फे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, आमदारांनाही निवेदन सादर केले आहे. निवेदन देताना सचिव जयदेव मानकर, विवेक बाबनवाडे, तुकाराम पुरणवार हजर होते. (शहर प्रतिनिधी)