सरपंचाच्या कुटुंबीयांना काेविड विम्याचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST2021-07-10T04:25:59+5:302021-07-10T04:25:59+5:30

गडचिराेली : काेटगल ग्रामपंचायतीचे सरपंच भारत खाेब्रागडे यांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेविड याेद्ध्यांसाठी लागू असलेल्या विम्याचा ...

Give the benefit of Kavid insurance to the Sarpanch's family | सरपंचाच्या कुटुंबीयांना काेविड विम्याचा लाभ द्या

सरपंचाच्या कुटुंबीयांना काेविड विम्याचा लाभ द्या

गडचिराेली : काेटगल ग्रामपंचायतीचे सरपंच भारत खाेब्रागडे यांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काेविड याेद्ध्यांसाठी लागू असलेल्या विम्याचा लाभ शासनाने द्यावा, अशी मागणी मुलगी अनामिका खाेब्रागडे व शिवकुमार सेमस्कर यांनी केली आहे.

भारत खाेब्रागडे हे २०१७ पासून काेटगलच्या सरपंच पदावर कार्यरत हाेते, तसेच काेविड-१९ साथराेग नियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करीत हाेते. लाेकांमध्ये काेराेनाबाबत खबरदारीसह लसीकरणाबाबत जागृतीचे काम करीत हाेते. याचदरम्यान त्यांनाही काेराेनाची लागण झाली. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना १६ मे राेजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात चार मुली आहेत. यापैकी तिघींचा विवाह झाला आहे, तर एक शिक्षण घेत आहे.

भारत यांच्या निधनाने खाेब्रागडे कुटुंबावर दु:खाचे डाेंगर काेसळले आहे. त्यामुळे शासनाने काेविड याेद्ध्यांना लागू केलेल्या विमा याेजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Give the benefit of Kavid insurance to the Sarpanch's family