कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:39+5:302021-06-09T04:44:39+5:30

एटापल्ली : कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली ५ जून राेजी ऑनलाइन सभा पार पडली. या सभेत ...

Formed the executive of Kastrib Gramsevak Sanghatana | कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी गठित

कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी गठित

एटापल्ली : कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली ५ जून राेजी ऑनलाइन सभा पार पडली. या सभेत एटापल्ली तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.

संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नरेश मडावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून दिवाकर झाडे, महिला उपाध्यक्ष जयश्री कुलसंगे, कार्याध्यक्ष प्रभाकर प्रधान, कायदे सल्लागार बंडू चाैधरी, महिला संघटिका लता मडावी, संघटक राजेंद्र शेंडे, नरेश घुटके, काेषाध्यक्ष रामचंद्र काेडापे, सदस्य मनाेज गेडाम, रघुनाथ मुडमा, नितीन गावराणे, मिथुन गाेनाडे, सुनील नन्नावरे, सुषमा उईके, रामचंद्र कळांबे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, जिल्हा सरचिटणीस मनाेज गेडाम, कार्याध्यक्ष देवेंद्र साेनपिपरे, संजीव बाेरकर आदी उपस्थित हाेते. अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचाऱ्यांचे पदाेन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विराेध करण्यासाठी संघटन मजबूत केले जात आहे, असे मार्गदर्शन देवानंद फुलझेले यांनी केले.

Web Title: Formed the executive of Kastrib Gramsevak Sanghatana