चितळाची शिकारप्रकरणी पाच आराेपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:31 IST2021-01-15T04:31:10+5:302021-01-15T04:31:10+5:30

चामाेर्शी : चितळाची शिकार करणाऱ्या पाच आराेपींना वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आनंदराव नामदेव शेंडे (३८, रा. हळदीचक), बालाजी ...

Five accused arrested in Chital poaching case | चितळाची शिकारप्रकरणी पाच आराेपींना अटक

चितळाची शिकारप्रकरणी पाच आराेपींना अटक

चामाेर्शी : चितळाची शिकार करणाऱ्या पाच आराेपींना वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आनंदराव नामदेव शेंडे (३८, रा. हळदीचक), बालाजी गणपती वाकुडकर (५७, रा. हळदीचक), अशाेक उष्टू आगरे (२३, रा. हळदीमाल), सदाशिव साेमाजी झबाडे (५६, रा. हळदीमाल), विकास कावरू गेडाम (२१, रा. भेजगाव, ता. मूल) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. चामाेर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या हळदी ते सेलूर रस्त्यालगत विद्युत वाहिनीवर बारिक तार टाकून या पाचजणांनी चितळाची शिकार केली. याबाबतची गाेपनीय माहिती मिळाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी पी. आर. लेले यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले असता, चितळ मृतावस्थेत आढळला. यावेळी घटनास्थळापासून १५० मीटर अंतरावर बांबूच्या खुंटीला लाेखंडी तार आढळली. या चितळाची शिकार कुणी केली, याबाबत गावात चाैकशी केली असता, या पाच आराेपींची नावे समाेर आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

Web Title: Five accused arrested in Chital poaching case