शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याहून अधिक एसटी बसेसमधील अग्निशमन यंत्रे झाली गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 05:00 IST

गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही वर्षे वापरलेल्या बस उपलब्ध करून दिल्या जातात. सर्वसाधारण चांगल्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर तर भंगार बस ग्रामीण भागात पाठविल्या जातात.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुविधांची ऐशीतैशी, गडचिराेली आगारातील अनेक बस झाल्या भंगार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्राची लाेकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. याचा थेट परिणाम एसटी बस गाड्यांवर दिसून येत आहे. एसटी हे प्रवाशी वाहन आहे. बसमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे आवश्यक आहे. मात्र, गडचिराेली आगारातील जवळपास निम्म्या बसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याची गंभीर बाब ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही वर्षे वापरलेल्या बस उपलब्ध करून दिल्या जातात. सर्वसाधारण चांगल्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर तर भंगार बस ग्रामीण भागात पाठविल्या जातात. एसटीचे चाक दिवसेंदिवस ताेट्यात रुतत चालल्याने कसेतरी करून प्रवाशांना सेवा देण्याचा संघर्ष एसटी करीत आहे. यासाठी कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

आपतकालीन दरवाजे वेल्डिंगने लाॅकअपघात किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास प्रवाशांना बसमधून उतरता यावे, यासाठी एक स्वतंत्र आपातकालीन दरवाजा दिला राहते. या दरवाजाला वर बाजुला दाेन कड्या राहतात. लाेकमतने केलेल्या पाहणीत एका मानव विकास मिशनच्या बसचा दरवाजा वेल्डिंगने लाॅक करण्यात आला हाेता. ही स्थिती इतरही बसमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चालकाच्या कॅबिनची दुरवस्थाचालक हा बसचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चालकाला बसमध्ये बसल्यावर साेयीचे वाटणे आवश्यक आहे. मात्र, बसच्या कॅबिनची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक स्विच तुटले आहेत. एकमेकांना वायर जाेडून काम चालविले जात आहे. बहुतांश बसच्या हाॅर्नचे बटन तुटलेले आहेत. वायर स्पार्किंग करून हाॅर्न वाजविली जात असल्याची माहिती चालकांनी दिली.

बसस्थानकावर दुचाकी वाहनेगडचिराेलीच्या बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भागात वाहने ठेवता येतात. मात्र, प्रवाशी थेट बसस्थानकापर्यंत वाहने नेतात. यासाठी काेणीही अटकाव करीत नाही. बसस्थानकाच्या समाेरच्या भागात प्रवाशी व बसची वर्दळ राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. 

बहुतांश बसचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत आहेत. एखाद्या बसचा दरवाजा वेल्डिंग करून लाॅक असेल तर ताे तत्काळ दुरुस्त केला जाईल. जवळपास ६० टक्के बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध आहे. काही यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. - मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली

 

टॅग्स :state transportएसटी