शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

निमय ताेडल्याने तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागपूर शहरात जातात. त्या ठिकाणी चाैकातील सीसीटीव्हीवरूनही कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात वाहतूक पाेलीस दिसत नसला तरी वाहतुकीचा नियम ताेडता कामा नये. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वाहतूक पाेलिसांकडून ई - चलन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही नियम ताेडले असाल, तर तुम्हाला माहीत नसतानाही तुमच्या वाहनाच्या नावाने ई-चलन केले जाते. मात्र, माेबाईल नंबर बदलल्याने चलनाचे संदेश येत नाहीत. त्यामुळे ई-चलनाचा भुर्दंड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिराेली जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी शहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने वाहनाची गती माेजली जाते. नियमापेक्षा जास्त गती असल्यास संबंधित वाहनाचे ई-चलन केले जाते. तसेच गडचिराेली शहरातील अनेक चारचाकी वाहने नागपूर शहरात जातात. त्या ठिकाणी चाैकातील सीसीटीव्हीवरूनही कारवाई केली जाते. त्यामुळे शहरात वाहतूक पाेलीस दिसत नसला तरी वाहतुकीचा नियम ताेडता कामा नये. नवीन परिवहन कायदा लागू झाल्यापासून दंडामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. एखाद्या वाहनधारकाकडे कारवाई करतेवेळी पैसे नसतील तर त्याचे ई-चालन केले जाते. सदर वाहनधारक कधी पैसे भरू शकतात. त्यामुळे अनेक जण वेळेवर पैसे भरत नाही. एकाच वाहनावर तीन ते चार चालनचे पैसे उधार राहत असल्याचे प्रकार वाढले आहेत. याची वसुली सुध्दा पाेलीस विभागाने करण्याची गरज आहे.

कसे केले जाते ई-चलनशहर वाहतूक शाखेकडे स्पीड माेजणारे यंत्र आहे. या यंत्रासाठी स्वतंत्र चारचाकी वाहन आहे. या वाहनात वाहनाची गती माेजणारे यंत्र ठेवले जाते. पाेलिसांचे हे वाहन रस्त्याच्या कडेला राहत असल्याने वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. मात्र, गतीची नाेंद केली जाते. नियम ताेडणाऱ्या वाहनाच्या नावाने आपाेआप ई-चलन तयार हाेते. त्यामुळे वाहनधारकांनी माेकळ्या रस्त्यावरही गतीने वाहन चालविता येणार नाही. 

ई-चलनाचे संदेश का मिळत नाही? वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मेसेज येत असतात. मात्र, अनेकांचा नंबर बदलल्यामुळे हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आरटीओ कार्यालयात जाऊन माेबाईल नंबर बदलून घेण्याची गरज आहे. 

या वेबसाईटवर मिळेल माहितीअनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आरटीओबाबतच्या समस्या आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे, हे तपासू शकता.   

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस