अखेर सहा महिन्यानंतर माेहटाेला - विहीरगाव मार्गाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:47+5:302021-04-20T04:37:47+5:30

वैरागड : वैरागड ते धानोरा या राज्य मार्गादरम्यान मोहटोला फाटा ते विहीरगावपर्यंतचा डांबरी रस्ता बनविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रस्ताभर बारीक ...

Finally, after six months, work on Mahtala-Vihirgaon road started | अखेर सहा महिन्यानंतर माेहटाेला - विहीरगाव मार्गाचे काम सुरू

अखेर सहा महिन्यानंतर माेहटाेला - विहीरगाव मार्गाचे काम सुरू

वैरागड : वैरागड ते धानोरा या राज्य मार्गादरम्यान मोहटोला फाटा ते विहीरगावपर्यंतचा डांबरी रस्ता बनविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी रस्ताभर बारीक गिट्टी पसरविण्यात आली होती. ही गिट्टी रस्ताभर पसरली होती. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत हाेता. याबाबत ‘लोकमत’ने अनेकदा वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले हाेते. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, सध्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेचा प्रवास सुखकर हाेणार आहे.

ब्रह्मपुरी - धानोरा या राज्य मार्गाचे काम धानोरा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, राज्य मार्गाची दुरुस्ती करण्यापूर्वी ठाणेगाव - वैरागडपर्यंत जे जुने सीडीवर्क हाेते, ते नष्ट करून त्याठिकाणी नवीन मोठे सिमेंट पाईप टाकून उंचीचे सीडीवर्क तयार करण्यात आले. हे सीडीवर्क तयार झाल्यानंतर रस्त्याच्या मधोमध खोदकामामुळे खड्डे पडले होते. ते आजही तसेच आहेत. ठाणेगाव - वैरागड दरम्यानचे हे खड्डे आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागदेखील बुजवायला तयार नाही. त्यामुळे या मार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे.

या राज्य मार्गावर मोहटोला ते विहीरगावपर्यंत नोव्हेंबर २०२०मध्ये डांबरीकरण करण्यासाठी बारीक गिट्टी पसरवण्यात आली. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे अडचणीचे झाले होते. याबाबत ‘लोकमत’नेही अनेकवेळा वृत्त प्रकाशित करून या मार्गाने प्रवास करताना होणारी अडचण दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर गेल्या पाच-सहा दिवसांपासून या डांबरी रस्त्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

===Photopath===

190421\19gad_2_19042021_30.jpg

===Caption===

माेहटाेला-विहीरगाव मार्गावर सुरू असलेले डांबरीकरणाचे काम.

Web Title: Finally, after six months, work on Mahtala-Vihirgaon road started