नागरिकांनी भरले योजनांचे अर्ज

By Admin | Updated: September 12, 2016 02:05 IST2016-09-12T02:05:37+5:302016-09-12T02:05:37+5:30

श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अहेरी यांच्या वतीने

Filing of schemes filled by citizens | नागरिकांनी भरले योजनांचे अर्ज

नागरिकांनी भरले योजनांचे अर्ज

आलापल्लीत युकाँचा पुढाकार : महिला-पुरूषांची गर्दी
अहेरी/ आलापल्ली : श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आलापल्ली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अहेरी यांच्या वतीने आयोजित सभेत अनेक नागरिकांनी अर्ज भरले. यावेळी नवीन शिधापत्रिका, नवीन मतदान कॉर्डसाठी नमुना सहाचा फार्म भरण्यात आला. यावेळी गावातील महिला-पुरूषांची प्रचंड गर्दी उसळली होती.
नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, याकरिता अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने वॉर्ड क्रमांक १ मध्ये सभा बुधवारी घेण्यात आली. या सभेत श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना यासह विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले. अनेक नागरिकांनी नवीन मतदान कॉर्ड तसेच नवीन शिधापत्रिकांसाठीही अर्ज भरले. यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गावडे, आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य सलीम शेख, अहेरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष उषा आत्राम, अरूणा गेडाम व महिला- पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Filing of schemes filled by citizens