शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ

By admin | Updated: August 18, 2016 01:35 IST

केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे.

अन्नधान्य, किराणा साहित्य महागले : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले गडचिरोली : केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे. तेल, साखर, मैदा, रवा, पोहे, चनाडाळ, गहू, आटा आदींसह स्वयंपाकघरात दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची भाववाढ केली आहे. याशिवाय भाजीपाल्यांचेही दर प्रचंड वधारले आहेत. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच भाववाढीमुळे गृहिणींचेही आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. महागाईने सारेच लोक त्रस्त आहेत. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरदारांना महागड्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे सहज सुलभ आहे. मात्र शेती व मोलमजुरी करणाऱ्या महिला तसेच खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना भाववाढीचा प्रचंड फटका बसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या फरकाने वाढ झाली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी पती-पत्नी, मुलगा व मुलगी असलेल्या एका लहान कुटुंबाला महिन्याकाठी दोन हजार रूपयांचा किराणा साहित्य पुरेसे होते. मात्र आता लहानशा कुटुंबाच्याही किराणा साहित्याला महिन्याकाठी ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये मोजावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेल, गॅस, कपडे, भांडे आदींसह चैनीच्या व मौल्यवान वस्तूंची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागड्या चैनीच्या व मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी धनाढ्य कुटुंबाचा कल आहे. सर्वसामान्य नागरिक या वस्तू खरेदी करताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. तसे गडचिरोलीतील काही व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रत्येक वस्तूंची भाववाढ झाल्याने शासनाच्या धोरणाबाबत नागरिक प्रचंड नाराज आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)