मादगी समाजातील गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: August 29, 2016 02:14 IST2016-08-29T02:14:36+5:302016-08-29T02:14:36+5:30

मादगी समाज वेलफेअर फोरम व मादगी समाज सामाजिक विकास संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने

Felicitation of quality in Madgi society | मादगी समाजातील गुणवंतांचा सत्कार

मादगी समाजातील गुणवंतांचा सत्कार

दहावी, बारावीतील विद्यार्थी : समाजाने आत्मचिंतन करण्याचे आवाहन
गडचिरोली : मादगी समाज वेलफेअर फोरम व मादगी समाज सामाजिक विकास संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. केवळराम गडसूलवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष तथा समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष समय्या पसुला होते. यावेळी मादगी समाज वेलफेअर फोरमचे अध्यक्ष भजनदास आलेवार, मादगी समाज संस्थेचे काशिनाथ देवगडे, किशोर नगराळे, प्रा. संजय लाटेलवार, राजेश कलगट्टीवार, देवाजी लाटकर, प्रभाकर इटकलवार, बाबुराव गडसूलवार, वर्षा लाटेलवार, सरिता पोवरे उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी राजेश्वर चोपादंडीवार, मेघा नरूले यांच्यासह सेट व पीएचडीधारक विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अ‍ॅड. गडसूलवार यांनी कठोर परिश्रमाने यश संपादन करता येते, असे प्रतिपादन केले. तर पसुला यांनी आपण इतर समाजाच्या तुलनेत मागे आहोत, त्यामुळे चिंतन करावे, असे आवर्जुन सांगितले. संचालन दिगांबर लाटेलवार यांनी केले. सुखदेव जिल्लेपल्लीवार, दौलत पोवरे, धर्मराव दुर्गमवार, नंदू कथले, सुरेंद्र चन्नेकार, सुधीर मुनघाटे, संतोष मुनघाटे, पोवरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Felicitation of quality in Madgi society