मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीन तास राेखली वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:21+5:30

कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळी होती. परंतु २-३ महिन्यांपासून येथे काही लाेकांनी अतिक्रमण केले. तेथील जागेची विक्री घरे बांधण्यासाठीही करण्यात आली.

The farmers waited for three hours for transportation | मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीन तास राेखली वाहतूक

मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीन तास राेखली वाहतूक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : चराईसाठी राखीव जागा ग्रामपंचायतला द्यावी, वन जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, धान खरेदी केंद्र सुरू करावे, कृषी पंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुराडा गट ग्रामपंचायतीमधील ४ गावांनी पुराडा येथे बुधवारी रास्ता राेकाे आंदाेलन करून ३ तास वाहतूक राेखली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.
कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील सर्वे क्रमांक १५९ मधील ३७० हे. आर जागा चराई व ढाेरफोडीकरिता राखीव, असे सातबारा वर नमूद असून ही जागा आजपर्यंत पुराडा व पुराडा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हेटीनगर, कन्हारटोला, कुंभीटोला येथील गुरांना चराईकरिता जागा मोकळी होती. परंतु २-३ महिन्यांपासून येथे काही लाेकांनी अतिक्रमण केले. तेथील जागेची विक्री घरे बांधण्यासाठीही करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायतीने तलाठ्यांना माहिती देऊन राखीव जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून जागेची मोजणी तहसीलदार यांच्या परवानगीने करून त्याची ‘क’ सीट तयार करण्यात आली. ही जागा ग्रा.पं.ला हस्तांतरण करावी यासाठी १५ नाेव्हेंबरला ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला. ही शासकीय जागा हडपण्याचा काही लाेकांचा डाव आहे. त्यामुळे जागेचा मालकी हक्क ग्रामपंचायतीला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. 
आंदाेलनात सरपंच अशाेक उसेंडी, राजेंद्रसिंह ठाकूर, पेशीलाल साेनागर, दिवाकर मारगाये, घिसूजी खुणे, मनाेहर साेनवाणी, उपसरपंच रामचंद्र राेकडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले हाेते.

धान खरेदी, वीजपुरवठ्याचाही प्रश्न ऐरणीवर
याशिवाय तालुक्यातील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करावे. कृषी पंपांना पूर्ण दाबाच्या वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत  नाही. काही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलात दुरुस्ती करावी व पूर्ववत २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी आंदाेलनातून करण्यात आली. 

अधिकाऱ्यांची आंदाेलनस्थळी भेट
आंदाेलनादरम्यान नायब तहसीलदार अंताराम मडावी, आविमचे व्यवस्थापक बावणे, पुराडाचे आरएफओ डिगाेडे व महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदाेलन स्थगित करण्यात आले. आरएफओंनी ४१ अतिक्रमणधारकांवर काेर्ट केस केली आहे, असे सांगितले.

 

Web Title: The farmers waited for three hours for transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.