शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

गोगाव सिंचन योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: August 26, 2016 01:19 IST

गोगाव-अडपल्ली येथील उपसा सिंचन योजना बंद असल्याने या उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेली....

गडचिरोली : गोगाव-अडपल्ली येथील उपसा सिंचन योजना बंद असल्याने या उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेली जवळपास ३७० हेक्टर शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे सदर सिंचन योजना तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाणी उपसा केंद्राजवळ जमा होऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वैनगंगा नदीच्या तिरावर अडपल्ली व गोगाव या दोन गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन ओलीताखाली आणण्यासाठी उपसा सिंचन योजना बांधण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ६५८ हेक्टर एवढी आहे. प्रत्यक्षात ३७० हेक्टरला पाणी दिले जात आहे. २००९ मध्ये या योजनेचे काम पूर्ण होऊन योजना सुरू झाली. मागील दोन ते तीन वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकरी धानाचे पीक घेत होते. मागील वर्षी या योजनेत बिघाड निर्माण झाला. उन्हाळ्यात शेतकरी कोणतेच पीक घेत नसल्याने योजना बंद होती. मात्र पावसाळ्यापूर्वी ही योजना सुरू करणे आवश्यक होते. योजना सुरू केली नाही. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने धानपीक करपण्याच्या मार्गाला लागले आहे. त्यामुळे सदर योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गोगाव, अडपल्ली येथील शेतकऱ्यांनी गुरूवारी उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कालिदास गणपत चापले, विधाते, नामदेव खोब्रागडे, दिवाकर बांगरे, मुखरू रायपुरे, भास्कर चौधरी, पुरूषोत्तम म्हशाखेत्री, रामदास खोब्रागडे, सुनील गेडाम उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)