शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृतक विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानापासून वंचित

By admin | Updated: June 19, 2016 01:17 IST

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुदानापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण

गडचिरोली : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुदानापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थ्यांचे कुटुंबीय वंचित आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जून रोजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षाकरिता अनुदान वितरणाचे आदेश काढले. मात्र यामध्ये गडचिरोली जिल्ह्यास वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील मृतक विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींना अपघातामुळे धोका झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-१३ पासून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत २१ विद्यार्थी नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणामुळे मृत्यूमुखी पडले होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाकडे १५ लाख ३० हजारांची मागणी करण्यात आली होती. यापैकी मार्च २०१६ मध्ये ७५ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांकरिता १३ लाख ५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली. मात्र राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)